Friday, July 21, 2023

लकडबघा

LAKADBAGGHA
लकडबगघा
जगात कसलीही तस्करी होऊ शकते.अगदी मोकाट रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांचीही तस्करी होऊ शकते. कोलकात्यात असेच काही भटके कुत्रे गायब होतात.त्यांचा वापर अंमली पदार्थ वाहतुकीसाठीही होतो.तर छोट्या मोठ्या हॉटेलात बिर्याणीत वापरले जातात.
अर्जुन बक्षी एक कुरियर सर्व्हिसवाला .सतत कानाला हेडफोन लावून फिरणारा.छोट्या मुलांना मार्शल आर्ट्सही शिकवतो .तो प्राणी मित्र आहे .भटक्या कुत्र्यावर प्रेम करतो.त्याचे ही काही कुत्रे आहेत.
शहरात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्यात.तर डॉकवर कुत्र्यांच्या शरीरातून अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीवरही हल्ला झालाय .हा हल्ला करणारा एकटाच माणूस होता असे  जखमी साक्षीदार सांगतात.
क्राईम ब्रँच ऑफिसर अक्षरा या केसची प्रमुख ऑफिसर आहे.
एके दिवशी अर्जुनच्या ताफ्यातील एक कुत्रा गायब होतो .तो त्याचा शोध घेत असताना त्याची अक्षराशी ओळख होते.
त्या दिवशी तो एक गोल्डफिश एका घरी डिलिव्हरी करतो पण खराब पॅकिंगमुळे गोल्डफिश मेलेला असतो.तो दुकान मालकाला जाब विचारण्यासाठी जातो तेव्हा तिथे काही प्राण्यांना अयोग्य रीतीने ठेवलेले असते .तो त्या प्राण्यांची सुटका करतो तेव्हा तिथे त्याला अजून एक प्राणी सापडतो .एक खास दुर्मिळ जातीतील तरस त्याच्याकडे पाहत उभा असतो . अर्जुन त्याला आपल्यासोबत घेऊन जातो
एके दिवशी हॉटेलात पार्सल डिलिव्हरी घेताना अर्जुनला आपल्या कुत्र्याच्या गळ्यातील बिल्ला सापडतो .तो आपला कुत्रा इथे खाण्यासाठी वापरला गेलाय हे समजून जातो आणि अधिक शोध घेताना त्याला तिथे अजून छोटे कुत्रे दिसतात.तो सगळ्यांची सुटका करतो.
अक्षरा तपास करीत अर्जुनपर्यंत पोचते .तरसची तस्करी होणार असते .ते गुंड अर्जुनच्या मागावर असतात.
कोण आहे या तस्करीच्या मागे ? अर्जुन त्या तरसाला वाचवेल ? यात कितीजणांचा बळी जाईल ? 
प्राण्यांची तस्करी ,आपण काय खातो ? या विषयावर असलेला हा चित्रपट झी5 वर आहे .

No comments:

Post a Comment