Friday, July 1, 2016

द डाग्ज...एक अनोखा प्रवास ..रणधीर खरे ..अनुवाद ..निरंजन घाटे


दक्षिण गुजरातच्या डागच्या जंगलातील हि अनोखी सफर ,तिथले आदिवासी ,त्यांचा इतिहास,याचे लेखकाने सुरेख वर्णन केले आहे .जंगलात फिरताना लेखकाने अनेक आदिवासीपाडयाना भेट दिली .जंगलातील अतिशय दुर्गम भागात राहणारे हे भिल्ल,कुणबी ,वारली,जातीचे आदिवासी याना शहराची काहीच माहिती नाही .लेखक एक अनुभव सांगतो कि स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने तिथे ध्वजारोहण करायला नेते गेले तेव्हा तेथील आदिवासींना कळले नाही कि काय चालू आहे ? त्यांनी जमातीच्या प्रमुखाला विचारले तेव्हा प्रमुखाने असे सांगितले कोणतातरी विधी चालू आहे .लेखकाने जंगलातील वणवा,मुसळधार पाऊस ,सहज संचार करणारे प्राणी यांचे सुरेख वर्णन केले आहे ,ते वाचतानाच अंगावर काटे उभे राहतात,आदिवासी लेखकाला प्रश्न करतात कि आम्हाला शिकवून काय होणार आहे ,? जंगल ,शेती ,शिकार ,नाच गाणे हेच आमचे जीवन आणि ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे .आम्ही शिकलो कि आमच्या जमाती नष्ट होतील.जंगल नष्ट होईल .इथे आदिवासींच्या प्रत्येक कृतिमागे एक इतिहास एक गोष्ट आहे ,त्यानुसार ते वागतात ,काही ठिकाणी नरबळी देण्याची प्रथा अजूनही आहे आणि कमरेपर्यंत उघडे राहायची पद्धतहि बऱ्याच आदिवासीपाडयात आहे .तंत्र मंत्र ,जादूटोणा ,मोहाची दारू यावरच त्यांचे जीवन आहे ,.अतिशय खोल जंगलातील आदिवासींच्या गोष्टी लेखकाने सुरेख पद्धतीने मांडल्या आहेत.


No comments:

Post a Comment