Monday, July 11, 2016

होकार

असा कसा फक्त चेहरा पाहून होकार देवू ???? आनंद आईवर खेकसला .तो नुकताच मुली बघण्याचा कार्यक्रम पार पाडून आला होता आणि आई त्याबद्दल विचारीत होती ." अरे मी आणि बाबांनी एकमेकांना पाहूनच पसंद केले होते .तरीही संसार करतोयच ना ?? आईचे नेहमीचे उत्तर .पण आनंदला हे मान्यच नव्हते ,बरेच काही प्रश्न ,काही शंका मनात होत्या त्या आधी clear करून घ्यायच्या होत्या ,मुलीच्याही मनात काही शंका काही प्रश्न असतीलच ना ? ती स्वतःचे घर सोडून आपल्या घरी फक्त आपल्या विश्वासावर येणार मग तिला काही हक्क नाही का आपल्याला प्रश्न विचारायचे हे आनंदचे मत .म्हणूनच त्याला मुलीला भेटायचे होते ,अनुष्का दिसायला देखणी ,साधी ती आपल्या एकत्रित कुटुंबात सामावून जायील ,सांभाळून घेयील ,याची त्याला खात्री होती पण हे त्याला सर्व आधीच स्पष्ट बोलायचे होते ,त्याने बाबांना सांगितले तेव्हा नेहमीप्रमाणे बाबांनी होकार दिला आणि हेच योग्य आहे असे बोलून त्याची पाठराखण हि केली .मग आनंदने फोन करून तारीख पक्की केली .ठरल्याप्रमाणे ती कामावरून थेट आली ,साधा पोशाख ,चेहऱ्यावर फार make up नाही ,नैसर्गिक भाव ,चेहऱ्यावर छानसे हसू आणत तिने विचारले "चला कुठे जावूया ?आनंदने तिला शिवाजी पार्कात आणले आणि कट्ट्यावर बसून भडभडा बोलायला सुरवात केली ,ती शांत पणे ऐकून घेत होती ,दोघांनी एकमेकांच्या मनातले बर्यापैकी बोलून टाकले ,दोघांच्याही मनावरचे ओझे कमी झाले ,एकमेकांना काहीप्रमाणात का होयीना पण समजून घेतले याचे समाधान घेवून निघालो ,उपहारगृहात तिने juice मागवला तसा  आनंद थोडा हडबडला ,आतापर्यंत वडा सांबर आणि दोघात एक चहा पिणारा माणूस तो .मुलगी बाहेर चांगले खाणारी दिसते अशी नोंद झाली .शेवटी एक आठवडा विचार करून निर्णय घ्यावा असे ठरले .होकार असेल तर उत्तम पण नकार असेल त्याची करणे देवू नये असेही ठरले .दोन दिवसांनी तिचा होकार आला आणि आनंदच्या आईचा जीव भांड्यात पडला .

No comments:

Post a Comment