Friday, July 8, 2016

रात्रीस खेळ चाले

सध्या झी वर सुरु असलेली रात्रीस खेळ चाले हि मालिका कोकणातील लोकांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकते .99% खरेपणावर आणि कोकणच्या वास्तवावर झुकणारी हि मालिका आहे .मी जरी कोकणातला असलो तरी गावाचा आणि माझा फारच कमी संबंध .गावकडले आमचे नातलग मुंबई ला यायचे तेव्हा आमच्याकडे कधी कधीमुक्काम करायचे.रात्रीच्या बोलण्यातून गावाकडची पुष्कळ माहिती मिळायची.बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यातून करणी, जागेवाला राखणदार,बाहेरची बाधा असे ऐकायला मिळायचे ,.आज त्या मालिकेतील पात्रे पाहून आमचे गाववाले,नातलग आठवतात ,तो वाडा तर बहुतेकांना आपला वाडा च वाटतो.कोकणात 80% घरे अशीच आहेत ,त्यातला दत्ता आणि त्याची बायको खरीखुरीकोकणी माणसे वाटतात,सर्वांच्या वेशभूषा हि कथेला अनुरूप.लेखकाने आतापर्यंतप्रेक्षकांना कोणताही निष्कर्ष काढू दिला नाही.संपूर्ण मालिकेभोवती एक गूढ वलय फिरवून ठेवलय,.मतकरी आणि धारप यांच्यागूढ कथेसारखे सतत काहीतरीआजूबाजूला आहे पण दिसत नाही कळत नाही ,पण काहीतरी भीतीदायक आहेयाची जाणीव सतत प्रेक्षकांना होत असते. अंगात येणे ,तोंडातून विचित्र आवाज बाहेर पडणेहा एक आजार आहे हे सिद्ध झाले आहे पण अजूनही कोकणात हि भूतबाधा आहे असेच मानतात इतकेच नाही तर मुंबईत राहणारे हि हाच प्रकार मानतात.मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेडे झालो अशीही भावना अजूनही आहे,आता हि मालिका फार काहीकाळ चालू शकणार नाही .पण शेवटी ती हि सर्व अंधश्रद्धा दूर करेल याची खात्री वाटते.

No comments:

Post a Comment