Saturday, July 2, 2016

ओव्हरलोड.. आर्थर हेली

ओव्हरलोड ..आर्थर हेली अनुवाद ..... वसु भारद्वाज   
    आर्थर हेलीचे एक वैशिष्ट्य आहे ,तो एक ठराविक गोष्ट नजरेसमोर ठेवून त्याभोवती सर्व कथानक फिरवत राहतो .एका विशिट्य चौकटीत त्याची कथा बांधली जाते पण तो त्याची खोली वाढवतो .मी आधी त्याचे एअरपोर्ट,हॉटेल,हि दोन पुस्तके वाचली आहेत ,दोन्ही पुस्तके त्या भोवतीच फिरतात अगदी अध्यक्षपासून ते खालच्या झाडूवल्यापर्यंत प्रत्येक पात्र महत्तवाचा बनतो .त्यामागचे खोलवर असलेले राजकारण ,आणि रहस्य यात वाचकाला गुंतवून ठेवतो .
ओव्हरलोड हि तशीच आहे ,एका प्रचंड वीजनिर्मिती करणाऱ्या अमेरिकेतील  कंपनीची हि गोष्ट .वाढती लोकसंख्या ,बदलणारे हवामान आणि कमी पडणार वीज पुरवठा यामध्ये कंपनी त्रस्थ झाली आहे .त्यातच एका दहशतवादी गटाने त्यांच्या विद्युतनिर्मिती केंद्रावर बॉम्बस्फोट घडवून आणलाय.कंपनी शहरापासून लांब असलेल्या जंगलात दुसरा प्रकल्प सुरु करू पहाते ,पण पर्यावरणवादी संघटना त्याला विरोध करतायत .एक ना एक अशा अनेक गोष्टी कंपनीच्या विरोधात जातायत .बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेली हि कादंबरी म्हणजे आजच्या परिस्थितीवर भाष्य करते जणू काही हे सर्व आताच्या कळताच घडतेय असे वाटते. आपण जणू या विषयातील तज्ञ बनतो .

No comments:

Post a Comment