Monday, July 4, 2016

फेसबुक

त्या दिवशी फेसबुक वर एका लहान मुलाचा फोटो पहिला ,शरीरभर असंख्य ठिकाणी सुया खुपसून त्याला नळ्या जोडल्या होत्या.आणी पोस्ट केले होते ह्या बाळासाठी आमेन बोला .खरोखरच अशी परिस्थिती आहे का ???काय मिळते लोकांना अश्या पोस्ट करून ,जर खरेच त्या बाळाला मदतीची गरज असेल तर त्याने त्याच्या डिटेल्स स्वतः द्याव्या .तसे काहीही नसते आणि आपण त्यातून काय बोध घ्यायचा तेच कळत नाही.बऱ्याचदा लहान मुले भीक मागताना दाखवितात ,किळसवाणे विडिओ दाखविले जातात ,ते पाहून आख्खा दिवस खराब जातो ,खरेच यातून काही मिळते का ?? उलट आपले विचार नकारात्मक बनत जातात,सोशल मीडिया चा वापर करून अश्या ९०%खोट्या गोष्टी आपल्या पर्यंत येतात.खरेच ज्यांना मदतीची गरज असते त्यांना असल्या गोष्टीमुळे मदत मिळत नाही.

No comments:

Post a Comment