Tuesday, July 5, 2016

शाळा

         शाळेत जाण्यात तो कधीच खुश नसायचा , युनिफॉर्म घालायची वेळ आली कि तो गंभीर बनायचा, मग हळू हळू डोळ्यातून अश्रू बाहेर पडायचे ,खूप जीव तुटायचा माझा ,कारण शाळेत पोचवायची जबाबदारी माझीच होती ना ,त्यांच्यासाठीच बऱ्याच वेळ 2 री आणि 3 री पाळी घ्यायचो मी.मग रस्त्यावरून चालताना सारखे समजावत शाळेच्या गेट पर्यंत पोचवायचो ,तो पर्यंत  तो माझे ऐकायचा मान  डोलाऊन रडणार नाही असे सांगायचा ,पण हाथ सुटला कि परत रडगाणे सुरूच ,मग मीहि दाटल्या कंठाने घरी यायचो,सतत तीन महिने हे चालू होते ,त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी नेहमीच शाळेचा पहिला दिवस होता तो ,सर्व मुले आता शाळेला सरावली होती पण हाच एकमेव होता ,कधी तो शांत होणार हेच कळत नव्हते .
      आणि अचानक तो एक दिवस आला ,त्या दिवशी काही कामानिमित्त मी शाळेत सोडायला गेलो नाही आणि त्याने गोंधळ केला ,दुपारी नेहमी प्रमाणे त्याला आणायला वर्गात गेलो तेव्हा मावशी बोलली आज दिवसभर रडत होता ,इतका कि टीचर नी त्याला पूर्णवेळ वर्गाबाहेर बसविले ,ऐकून माझी हि सहनशक्ती संपली ,बाहेर येऊन पहिल्यांदाच बापाचा खरा आवाज बाहेर काढला ,निव्वळ डोळे आणि हावभावावरून कळले आता काय घडणार आहे ,त्याचा चेहरा अधिक केविलवाणा झाला .घरी येऊन पहिल्यांदाच दमात घेतले त्याला .त्या दिवसापासून आज पर्यंत शाळेत जाताना कधीच रडला नाही .
        मला त्याच्या टीचरला धन्यवाद दिले पाहिजे .खरेच त्या बाईने शेवटपर्यंत माझ्याकडे कधीच त्याची तक्रार केली नाही कि तुमचा मुलगा सर्व वेळ रडत असतो ,तसे केले असते तर माझी त्याला समजावण्याची उमेदच संपली असती .
       सहामाई चा result पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला ,त्याने सर्व विषयात A आणि B+ शेरा मिळवला होता .सर्व पालक बाहेर गेल्यावर मी टीचर ला विचारले कि हा नक्कीच त्याचा result आहे का ???कारण त्याचे 3 महिने फक्त रडण्यातच गेले होते.तिने मोठ्याने हसून मान डोलावली, आणि त्या दिवशी डोळे पुसत घरी जाण्याचा आनंद अनुभवला मी.

No comments:

Post a Comment