Sunday, July 3, 2016

चित्रपट

       लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीची काही स्वप्न असतात. अगदी छोटी छोटी, पण असतात. आपल्या भावी पतीने आपल्याला cinema ला घेऊन जावं हे तर नक्कीच वाटत असतं.
      पण मी या गोष्टीला अपवाद आहे.पत्नीबरोबर किंवा कुटुंबाबरोबर थिएटरमध्ये जाऊन अतिशय कमी चित्रपट पहिले आहेत मी. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत.लग्नाच्या आधी बायकोने कधी आग्रह केला तर तिला सांगायचो, "अरे काय त्या टॉकीजमध्ये जाऊन तीन तास त्या पडद्यावरील चित्र पाहत बसणार त्यापेक्षा समोरासमोर बसून भेळ खात भावी आयुष्याबद्दल बोलू , एकमेकांना समजून घेऊ. तीही असे रोमँटिक, भावनिक ऐकून खुश व्हायची. आणि लग्नानंतर आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही, जो मिळतो तो असे चित्रपट बघून फुकट घालवायचा का असे बोलून तिला गप्प करायचो. पण खरे कारण हे होते की चित्रपट पाहताना मला खूप झोप यायची, बघता बघता कधी झोपून जायचो हे कळायचेच नाही. कधी कधी शेजारच्या सीट वरचा माणूस मला उठवून जायचा.
      15 वर्षांपूर्वी हे ठीक होते, त्यावेळी 5 रु तिकीट होते, आता मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन झोपणे परवडणार नाही .पण धन्य आहे माझ्या बायकोची 15 वर्षात तिने याबाबत कधीच माझ्याकडे तक्रार केली नाही. आणि कौतुक फक्त बायकोचं नाही, तर तितकच माझ्या लेकाचं पण आहे. कारण तो मित्रांकडून ऐकत असेलच काल हा picture पहिला आता हा हा radar वर आहे पण त्यानेही कधी कुरकुर केली नाही.
      उलट मी तर म्हणेन की मोकळा वेळ हा घरातल्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारत घालवण्याचा, एकमेकांचे विचार जाणून घेण्याचा एक सुंदर संस्कार नकळत का होईना त्याच्यावर झाला.

No comments:

Post a Comment