Tuesday, July 12, 2016

स्टार्ट गिविंग

शासकीय तंत्रनिकेतन ठाणे ,येथून १९९२ ला बाहेर पडलो आणि ज्याने त्याने आपला मार्ग निवडला .तसे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात होताच .आम्ही काहीजण ३ महिन्यातून एकदा भेटायचो .फेसबुक आणि व्हात्स अप मुळे सगळे एकत्र आलो .मग सुरु झाले अमर्यादित chatting .कधीतरी सहल ,स्नेह संमेलन ,अचानक कोणीतरी एक दिवस प्रश्न केला कि मोठी प्रसिद्ध माणसे समाजासाठी काय करतात .तर दुसर्याचा ताबडतोब प्रती प्रश्न अरे xxxx तू काय करतोस समाजासाठी ????झाले सुरु झाले सर्वांचे वाद विवाद आणि ठरले आतापर्यंत समाजाकडून घेतच राहिलो आता वेळ आलीय काहीतरी समाजाला परत देण्याची .मग त्यानिमित्ताने परत एकत्र आलो सगळे आणि एक निर्णय घेतला ,आपल्या कुवतीनुसार शिक्षण क्षेत्रात काहीतरी करू .हीच वेळ आहे सामाजिक ऋण फेडण्याची .आणि एकमेकांच्या विश्वासावर उभी राहिली स्टार्ट गिविंग फौंडेशन .मुलांना शाळेत आणण्यासाठी जे काही योग्य असेल ते उपलब्ध करून त्यांना शिक्षणाची गोडी लावावी हे प्रमुख सूत्र समोर ठेवून कामाला सुरवात केली .आम्हाला माहित आहे कि हे काही मोठे कार्य नाही पण जे काही करू ते एकमेकांच्या विश्वासावर आणि योग्य मार्गाने करू .

No comments:

Post a Comment