Tuesday, July 5, 2016

THE BOY IN STRIPEED PAYJAMA बाय john boyne

      दुसरे महायुद्ध म्हणजे कथांचा एक मोठा खजिनाच आहे .कित्येक चित्रपट ,कथा या महायुद्धा वर लिहिल्या गेल्या,अजूनही लिहिल्या जातात ,त्यातील हि एक कथा,खरे म्हणजे हि कथा नाही तर शोकांतिका आहे एका लहान मुलाची ,त्याच्या छोट्या भावविश्वाची.ते पुस्तक परत परत वाचावे असे कधीच वाटत नाही पण एकदा वाचले कि मनात खोलवर घुसते.पुस्तक समोर असते पण वाचू शकत नाही.
     नाझी कर्नल बदली होऊन आपल्या कुटुंबासह अशा ठिकाणीं येतो जिथे नाझी नि छळ छावणी उभारली आहे ,कर्नल च्या मुलाचे छावणीतील कुंपणापालिकडे राहणाऱ्या एका सम वयीन मुलाशी दोस्ती होते,दोघेही नेहमी ठराविक वेळी एकत्र येऊन आपापल्या जगविषयी बोलतात ,दोघांनाही एकमेकांच्या जगाबद्दल आकर्षण वाटतं.शेवटी एकमेकांचे कपडे बदलून दोघेही कुंपण ओलांडून एकमेकांच्या जगात प्रवेश करतात,नेमक्या त्याच दिवशी छावणीतील सर्व मुलांना गॅस चेंबर मध्ये नेण्यासाठी एकत्र केले जाते ,त्यात कर्नालचा मुलगा हि ओढला जातो .अतिशय हृद्यस्पर्शी हि कथा लेखकाने मुलांच्या निरागसपणे रेखाटली आहे .या कथेवरील चित्रपट हि उत्तम आहे

No comments:

Post a Comment