Saturday, July 9, 2016

द जंगल बुक

द जंगल बुक. .....रुड्यार्ड किप्लिंग चे अजरामर पुस्तक .त्यावरूनच आताच प्रदर्शित झालेला चित्रपट  पहिला .लहानथोरांना मोगलिने वेड लावले .नाना पाटेकर चा शेरखान अजूनही अंगावर काटा आणतो आणि हृदयाचा थरकाप उडवतो .तर ओम पुरीच्या आवाजातील बगीरा
नेहमीसारखा समंजस आणि जंगलातील कायदे
पाळणारा .खरेच काही कलाकृती इतक्या अजरामर झाल्यात कि यापुढील कित्येक पिढ्यांच्या मनावर राज्य करतील .त्यातलीच
हि एक कलाकृती .आज मुलाबरोबर जंगल बुक
पाहताना माझे मन मागे गेले .गुलजारचे ते प्रसिद्ध
गाणे जंगल जंगल बात चली है पता चला है सुरु झाले कि आम्ही जेथे असू तेथून धावत tv पाशी यायचो .तो मोगली आम्हाला आमचा मित्र  वाटायचा आम्ही सर्व मनाने त्याच्या बरोबर जंगलातील सैर करायचो .आजही तेच सर्व अनुभवले मी .परत लहान झालो मी .

No comments:

Post a Comment