Wednesday, July 6, 2016

जिंकून हरलेली लढाई.... सचिन वाझे

जिंकून हरलेली लढाई.... सचिन वाझे
२६ नोव्हेंबर २००८ मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस,मुंबईकर हा दिवस कधीही विसरणार नाहीत.अजमल कसाबसह ९ अतिरेक्यांनी मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी भयानक हल्ला केला .लेखकाने जणू आखों देखा हाल असे वर्णन या पुस्तकात केले आहे.संपूर्ण पुस्तकात त्याने प्रत्यक्षात जे घडले ते तसे त्या तसे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.मुंबई पोलिसांची अतुल्य कामगिरी ,NSG च्या पथकाची डोके शांत ठेवूंन मारलेली धडक  आणि मार्कोसची लाभलेली साथ यामुळे अतिरेक्यांवर मात करता आली .विशेब बाब म्हणजे लेखकाने यात कोणताही राजकीय पक्ष आणला नाही .संपूर्ण पुस्तकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा साधा उल्लेख हि नाही ,तर या मोहिमेत प्रत्यक्षपणे भाग घेणाऱ्या लहानात लहान पोलिसांचा,तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे .प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे हल्ला झाला तेव्हा ते काय करीत होते ,कसे तिथे पोचले,हे सर्व लेखकाने कुशलतेने सांगितले आहे .मुंबई पोलिसांची अपुरी शस्त्रे,मध्येच लॉक होणाऱ्या बंदुका हे वाचून आपल्या पोलीस दलाची काय हालत झाली असेल तेही कळते,संपूर्ण पुस्तक वाचत असताना आपण त्या अतिरेक्यांच्या मागे राहून सर्व पाहतो आहे असे भासते.मृत्युमुखी पडलेली माणसे ,स्त्री,पुरुष ,कोवळी मुले तिथे कशासाठी हजर होती याचेही लेखकाने थोडक्यात वर्णन केले आहे ,निरपराध माणसांचे अचानक झालेले मृत्यू पाहून मन हेलावून जाते.पण इतके होऊनही दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे आणि सगळ्या संकटाचा धीराने सामना करणारे मुंबईकर आणि मुंबई पोलीस पाहून छाती अभिमानाने भरून येते ,तपासाचे १२००० कागदपत्र,३००० पानी निकालपत्र ,अजमल कसाबची जबानी,त्याचे अतिरेकी बनण्याची कहाणी वाचून मन सुन्न होते .प्रत्येक मुंबईकरांच्या घरात असलेच पाहिजे असे हे पुस्तक .हे पुस्तक नेहमी मुंबईकरांना त्यांच्या  धैर्याची आठवण करून करून देईल.

No comments:

Post a Comment