Saturday, July 9, 2016

भूत

बहुतेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने हे विस्तीर्ण जागेत पसरलेले असतात .त्यामुळे त्यांच्या जागेबाबत हि अनेक आख्यायिका पसरलेल्या असतात .सर्वच ठिकाणी तिन्ही पाळ्या काम चालू असते त्यामुळे वेगवेगळ्या अफवाचे पीक उगवत असते .भुताखेतांच्या गोष्टीहा सर्वांच्या आवडीचा विषय .प्रत्येक कारखान्यात एखादे तरी भूत फिरतच असते .काही ठिकाणी ती बाई असते तर काही ठिकाणी 7 फूट उंचीचा माणूस .जो तो प्रसंगानुसार भूत बदलतो .मला आठवतय मी मुंबई एके ठिकाणी कामाला होतो त्या बाजूला मुस्लिम स्मशानभूमी होती.पण तिथे कधीच मुस्लिम भूत दिसले नाही पण एक बाई हमखास फिरायची असे बरेचजण बोलायचे .मी अनेक वेळा रात्रपाळी करायचो .मध्यरात्री ,पहाटे पूर्ण  कंपनीभर फिरायचो पण एकदाही ती बाई दिसली नाही.आमच्या एका बॉयलर अटेंडंट चा अकाली मृत्यू झाला होता तेव्हा इतर अटेंडंट सांगायचे कि तो आजूबाजूला असल्याचा भास होतो .पण मला कधी जाणवले नाही .कदाचित हे सर्व आपल्या मनावर अवलंबून असेल.हो पण राऊंड मारताना हे सर्व मनात आले कि एक प्रकारची भीती मनामध्ये दाटून यायची आणि अश्यावेळी मी तो राऊंड पूर्ण न करताच मागे फिरायचो .मी हे सर्व हसण्यावारी नेतो म्हणून मला कधी या गोष्टी चा त्रास झाला नसेल .झी वाहिनीवर रात्री रात्रीस खेळ चाले हि मालिका सुरु आहे त्यावरून हे आठवले .

No comments:

Post a Comment