Sunday, July 10, 2016

डेड मॅन्स फॉली.. अगाथा ख्रिस्ती...... अनुवाद ..मधुकर तोरडमल

डेड मॅन्स फॉली.. अगाथा ख्रिस्ती...... अनुवाद ..मधुकर तोरडमल
"क्वीन ऑफ क्राईम "म्हणून जगप्रसिद्ध असलेली अगाथा ख्रिस्ती हिची अजून एक खून रहस्यकथा ,1956 साली लिहिलेली आणि अजूनही प्रसिद्ध असलेला तिचा आवडता मानसपुत्र  हरक्युल पायरो याची हि कथा.केवळ तर्क शास्त्र आधारावर पुरावे शोधत मूळ खुनी शोधायची पद्धत.
एका मोठ्या हवेलीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता  .त्यामध्ये खेळ म्हणून  खुनाचे नाट्य उभे करण्यात आले आहे .त्यासाठी सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिकेला यासाठी पाचारण करण्यात आले  ,पण कुठेतरी त्या लेखिकेला काहीतरी विपरीत घडणार याची जाणीव होते आणि ती पायरोला आमंत्रित करते.तिची अंत:प्रेरणा खरी ठरते आणि खरोखरच खून होतो .आता खरा खुनी शोधायची जबाबदारी पायरो वर आली आहे.
अगाथा ख्रिस्ती बद्दल बोलावे तितके कमीच आहे

No comments:

Post a Comment