Friday, July 1, 2016

स्मार्टफोन

    त्या दिवशी नेहमीप्रमाणे ५.१० ची लोकल पकडली. नेहमीची विंडो सीट मिळाली आणि मस्तपैकी पुस्तक काढून वाचायला सुरवात केली. मुलुंडला एक कॉलेजचा ग्रुप डब्यात चढला आणि नेमका माझ्या बाजूला सर्व बसले. मनातल्या मनात चारफडलो. वाचनाची लागली वाट...! 
    त्यामध्ये दोन तरुणी आणि तीन मुले होती. मुलींचे जरी जीन्स आणि टी-   शर्ट होते तरी त्यांचे मराठी मध्यमवर्गीयपण दिसत होतेच. अर्थातच सगळ्यांच्या हाती मोठ्या स्क्रीनचे फोन. अचानक त्यातली एक मुलगी बोलली "अरे आहे का काही ??? दे ना, बरेच दिवस काही बघितलेच नाही, चल शेअऱ कर ". मी उडालोच, तर दुसरी म्हणते "इंडियन असेल तरच दे". हे मात्र अतीच झालं,मी स्त्रीमुक्ती पुरस्कृत असलो तरी हे ऐकायची सवय नव्हती मला. पुस्तक मिटून डोळे बंद करून स्वतःला सावरले. मनात म्हटले स्मार्टफोनने खूपच क्रांती घडवून आणलेली दिसतेय.
        इतक्यात एक मुलगा म्हणाला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे पण ई मेल माहित नाही यार मला... तर दुसरा म्हणाला अरे मला तर ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा तेच माहित नाही. आणि कहर म्हणजे यावर त्यांनी खिदळत एकमेकांना hi fi दिला..... म्हणजे त्यासाठी त्यांना लाजही वाटत नव्हती. पण हेही तितकच खरं की ही सगळी पिढी अशी नाही.
      पण मग स्मार्टफोनचा वापर फक्त फेसबूक, व्हाट्स अॅप आणि चित्रपट पाहण्यासाठीच होतो का ???  होय नक्कीच. बऱ्याच जणांना मी पाहिले  आहे ते फक्त चॅटिंगसाठी आणि फेसबुक साठीच नेट वापरतात..... अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याचा वापर लोक करत नाहीत. ज्या दिवशी सर्वजण नेट चा वापर समर्थपणे करतील त्या दिवशी देश थोडा पुढे जाईल असे समजू आपण.

No comments:

Post a Comment