Tuesday, July 12, 2016

बंडखोर

मी का येवू नये स्मशानात ??? मी का करू नये माझ्या  वडिलांचे अंत्यसंस्कार ?? वडिलांच्या शवाच्या शेजारी बसून मधूने हे प्रश्न विचारले आणि सगळेच स्तब्ध झाले .वातावरणात एक तणाव निर्माण झाला .अर्थात आम्हाला हे घडणार याची जाणीव  होतीच
मधुरा वराडकर  आमच्या  ग्रुपमधली  एक  .आई  वडिलांची  एकुलती  एक .सुखवस्तू  कुटुंब .पण  मुलगा म्हणूनच तिची वाढ झाली .त्यात आमच्यासारख्या  टवाळखोर आणि  बंडखोर मुलांशी  दोस्ती .चांगली शिकली आणि  लग्न हि  केले .नवरा  सारखा नोकरीच्या  निमित्ताने  घराबाहेर आणि  हि  सासर माहेर सांभाळू लागली .एक  दिवस पहाटे ३  वाजता  वडिलांना अर्धान्वायुचा  झटका आला .आणि  एकटीने  त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले .सकाळी विचारले तर म्हणाली तुम्हाला का बायकोच्या                                                       मिठीतून   उठवू .मी उचलले बापाला आणि घेवून आले .त्यानंतर ६ महिने त्यांची सेवा केली.परवा ते वारले आणि तिने फक्त ५ मिनिटे आक्रोश केला..नातेवायिक आले ,मित्रमंडळी जमा झाली.आणि हिने पदर खोचून सगळी सूत्रे आपल्या हाथी घेतली .मी तिला विचारले लाकडे कि विद्युत दाहिनी तर म्हणाली आता लाकडेच पुढच्या वेळी बघू .मी रागावलो पण तिचा चेहरा पाहून राग निवळला .सत्याला सामोरे जाण्याची ताकद होती तिच्यात .वडिलांचा अखेरचा प्रवास चालू झाला आणि  तिने वरील  प्रश्न केला .६ महिने मुलगा बनून वडिलांची सेवा केली मग शेवटच्या प्रवासात का डावलले जाते मला ?? एक स्त्री आहे म्हणून ???तिच्या डोळ्यातील निश्चय पाहून आम्ही थरारलो आणि तिच्या पाठीशी उभे राहायचे ठरविले .आमचा बंटी   बापाचा  विरोध डावलून खांदा द्यायला सरसावला .जुने विरुद्ध नवे असे गट पडले .मधु उचल मडके आणि हो पुढे असे मी म्हणालो .मधु मडके घेवून पुढे निघाली .पुढील सर्व विधी तिनेच केले .
बाहेर टपरीवर चहा पिताना मी तिला विचारले आता १० व्हयला केस काढणार का ?? तर हसत म्हणाली हल्ली नाही काढले तरी चालतात पण थोडे कापीन .शेवटी दारात उभी राहून हाथ हातात घेवून भरल्या कंठाने म्हणाली आज तुमच्या पाठींब्यावर समाजाच्या रीतीरीवाजाविरूढ वागले .पण एक कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान आहे .नाहीतर यापुढे रात्री कधीच सुखाने झोपू शकले नसते .तिचा तो समाधानाने फुललेला चेहरा पहिला आणि खर्या मैत्रीची जाणीव झाली .

No comments:

Post a Comment