Saturday, July 2, 2016

मृत्यू

     मृत्यू....जीवनातील अंतिम सत्य!  ज्याचा झाला तो सुखी, त्याचे आप्त सर्वात दुःखी. कधीतरी एखाद्या घरात त्या दुःखातही दुर्दैवानी स्पर्धा बघायला मिळते. असो..... त्यात आपण न पडलेलं बरं.
     हा मृत्यूही वेगवेगळ्या रुपाने येतो.कधी हृदयावर अचानक घाव घालतो तर कधी हळू हळू कंटाळवाण्या स्वरूपात येतो, तर कधी वादळासारखा येतो आणि काहीजणांना वाहून नेतो. मृत्यूला वेगवेगळ्या प्रतिक्रिया हि देणारे अनेक जण आहेत. काहींना तर जवळच्यांचा मृत्यू सोसवत नाही तर काही खुश होतात तर काही मृत्यूची लवकर यावा म्हणून प्रार्थना करतात.
      पण खरी मजा येते ती मृत्यू नंतर होणाऱ्या अंत्यसंस्कारात. यावेळी जो गोंधळ घातला जातो ते पाहून हसावे कि रडावे तेच कळत नाही. मी बऱ्याच जणांच्या अंत्यसंस्काराला गेलो आहे. मी अंत्यसंस्काराच्या प्रकियेतही सहभागी असतो पण त्यावेळीं जो गोंधळ घातला जातो ते पाहून त्यामध्ये न पडलेले बरे असे वाटते. अगदी सामान आणण्यापासून ते अग्नी देण्यापर्यंत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात असतात. प्रत्येक वेळी असे वाटते आपण पहिल्यांदाच अंत्यसंस्काराला आलो आहोत. एकदा माझ्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो तेव्हा प्रेताला समुद्रावर नेऊन पाणी पाजूया या मताचा एक गट होता तर दुसरा समुद्राचे पाणी इथे आणून प्रेताला पाजू या मताचा होता. दोन्ही गट आपापली बाजू हिरहिरीने मांडत होते, स्मशानभूमीचे युद्धभूमीत रूपांतर होणार अशी चिन्हे दिसत होती. माझा मित्र कोपर्यात डोक्याला हात लावून बसला होता. शेवटी एका गटाने माघार घेतली आणि दुसरा गट जिंकल्याच्या आविर्भावात मोठ्या अभिमानाने प्रेताला तिरडीसकट समुद्रावर घेऊन गेला, काठावर गळ्यातगळे घालून बसलेल्या प्रेमी युगुलाला बाजूला सारून त्यांनी समुद्राचे पाणी पाजले त्यानंतर पुढचे विधी झाले. मित्राच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव पसरले.
खरेच या प्रथा योग्य कि अयोग्य हे मांडायचा मी प्रयत्न करीत नाही तर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रथा वापरा हा हेतू आहे.

No comments:

Post a Comment