Friday, July 8, 2016

महानगर

सुमारे 30 वर्षांपूर्वी व.पु.चे महानगर असा कथासंग्रह वाचा होता .नाव  कदाचित वेगळेही असेल ,पण त्यात एक कथा होती .लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्यांची ती कथा होती ,रोज प्रत्येक ग्रुप मध्ये कोणतरी स्वतःचे दुःख बोलता बोलता सांगून जायचा त्याच वेळी तिथे असलेला माणूस स्वतःचे दुःख समोरच्या माणसाच्या दुःख पेक्षा किती मोठे आहे आणि तरीही मी जगतो आहे हे सांगायचा. ते ऐकून समोरचा स्वतःचे दुःख विसरून त्याला सहानुभूती द्यायचा ,दुसऱ्या दिवशी तो माणूस दुसऱ्या लोकल मध्ये असायचा ,सेम गोष्ट ,आपले दुःख समोरच्याच्या दुखापेक्षा किती मोठे आहे हे सांगून लोकांची सहानुभूती घ्यायचा.लेखक एकदा त्या माणसाचा पाठलाग केलातेव्हा स्टेशन बाहेरच्या आपल्या मर्सिडीज मध्ये बसून तो माणूस निघून गेला.दुसऱ्या दिवशी परत लोकल मध्ये त्या माणसाचे दुःख सुरु झाले ,तुमच्यापेक्षा माझ्या जीवनात किती प्रॉब्लेम आहेत ,किती अडचणी आहेत वैगेरे.लेखकाने त्याला नंतर बाजूला घेऊन विचारले तुम्ही असे का करता ??त्याने उत्तर दिले कि मी खूप श्रीमंत माणूस आहे ,मला कोणतेही दुःख नाही .पण मी मध्यमवर्गीयांच्या लोकल ट्रेन मधून प्रवास करतो आणि त्यांची दुःखे ,अडचणी ऐकून घेतो ,मी प्रत्येकाला मदत करू शकत नाही,मग काय करता येईल आपल्याला हा विचार केला ,तेव्हा लक्षात आले कि काहीवेळ का होईना आपण त्यांचे दुःख विसरवू शकतो ,मग त्यांच्या अडचणी ,दुःख पेक्षा स्वतःची दुःखे सांगूलागलो तीही त्यांच्यापेक्षा मोठीच,लोक स्वतःची प्रॉब्लेम विसरून मला सहानुभूती देऊ लागले ,म्हणाले आहो आम्ही बरे तुमच्यापेक्षातुमच्या शिवाय कोणालाही माहित नाही मी कोण आहे ,कृपा करून कोणाला सांगू हि नका.
आज काही काळ का होईना लोक स्वतःची दुःखे विसारतायत .असे बोलून तो दुसऱ्या लोकल मध्ये चढला ,आज इतकी वर्ष झाली ते पुस्तक वाचून पण हि गोष्ट अजून हि माझ्या लक्षात आहे ,किती छोट्या छोट्या गोष्टी आहेतया जगात दुःखे हलके करण्याच्या .व.पु. आणि श.ना. यांचे हेच वैशिट्य आहे.ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून बरेच काही शिकवितात .व.पु. ची हि कथा मला खूप काही शिकवून गेली .आजही मी हि कथा मित्रांमध्ये सांगतो.

No comments:

Post a Comment